Top News कोरोना देश

पाकिस्तानला हवी भारतीय लस; पुण्यातील सीरमच्या लसीसाठी प्रयत्न सुरु!

नवी दिल्ली | 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताशी थेट संवाद साधून किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मित्र राष्ट्रांच्या मदतीनं भारतात तयार करण्यात आलेली करोना लस मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

भारतामध्ये निर्माण करण्यात आलेली कोरोनावरील लस मिळवण्यासाठी पाकिस्तानने हलचाली सुरु केल्यात. पाकिस्तानमध्ये पाच लाखांहून अधिक कोरोनाबाधित असून येथे ११ हजारांहून अधिक जणांना करोनामुळं मृत्यू झाला आहे.

तसंच, जागतिक स्तरावर लसीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोव्हॅक्सच्या माध्यमातून भारतीय लस मिळवण्याचा इस्लामाबादचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर कोईलेशन फॉर पॅनडॅमिक प्रिपेडनेस इनोव्हेशन (सीईपीआय) आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीनेही भारतातील लस पाकिस्तानामध्ये आणता येईल या यासंदर्भातील विचार सुरु असल्याची माहिती समोर येतं आहे.

दरम्यान, कोव्हॅक्सच्या माध्यमातून जगभरातील १९० देशांमधील जागतिक लोकसंख्येच्या २० टक्के लोकांना मोफत लस देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये पाकिस्तानला कोव्हॅक्सच्या माध्यमातून लसींचा पहिला पुरवठा केला जाईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आहे.

थोडक्यात बातम्या-

परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

कारभारी लयभारी!; …म्हणून पत्नीनं आपल्या पतीला थेट खांद्यावर उचलून घेतलं!

धक्कादायक! लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू

“स्वतःला जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही”

ऋषभ पंतने माहीचा हा विक्रम मोडत झाला नंबर वन यष्टीरक्षक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या