पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचं मोदींना पत्र, केली ‘ही’ मागणी
नवी दिल्ली | पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शहबाज शरीफ (PM Shehbaz Sharif) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहिलं आहे. शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित दोन्ही देशांमध्ये अर्थपूर्ण संबंध देऊ केला आहे.
शहबाज शरीफ पाकिस्तानचे 23वे पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शरीफ यांचं अभिनंदन केलं होतं. तर शहबाज शरीफ यांनी आता पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाला उत्तर म्हणून हे पत्र लिहिलं असल्याचं म्हटलं जात आहे.
पाकिस्तानला (Pakistan) भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध हवे आहेत. पाकिस्तानला जम्मू-कश्मीरसह (Jammu-Kashmir) सर्व प्रश्नांवर शांततापूर्ण तोडगा हवा आहे. दहशतवादाविरूद्ध लढताना सर्वांना पाकिस्तानचं बलिदान माहिती आहे, असं शरीफ यांनी पत्रात नमूद केलं आहे.
दरम्यान, शरीफ यांनी पंतप्रधान मोदिंना लिहिलेल्या पत्रात काश्मीसह वादग्रस्त प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. तर पाकिस्तान भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंधांना अनुकुल असल्याचं देखील पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! शिवसेना आमदाराच्या पत्नीने राहत्या घरी घेतला गळफास
पोस्टाची भन्नाट योजना; सुरक्षित गुंतवणुकीच्या विचारात असाल तर आत्ताच गुंतवा पैसे
“राजकारण सोडून हिमालयात जायची संधी कोल्हापूरकरांनी दिली होती, पण…”
“कपड्यांचे रंग बदलून कधीही हिंदुत्त्व येत नाही, ते तर…”
‘… तर आमचेही हात बांधलेले नाहीत’, राज ठाकरेंचा थेट इशारा
Comments are closed.