पाकिस्तानचा अमेरिकेशी पंगा, ट्रम्प यांच्या अरेला कारे..

मुंबई | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांना पाकिस्तानने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये आता दहशतवादाच्या मुद्द्यावरुन चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

आमच्या देशातल्या हवाई तळांवरुन तुम्ही अफगानिस्तानवर 57 हजार 800 हल्ले चढवले. तुम्ही सुरु केलेल्या या युद्धात आमचे हजारो नागरिक आणि जवान मारले गेले आणि तुम्ही वरुन आम्हालाच विचारता पाकिस्ताननं काय केलं?, असा सवाल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी  ट्विटरवरुन डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलाय. 

नववर्षाचं स्वागत करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर हल्ला चढवला होता. पाकिस्तानला मदत करुन काहीच फायदा नाही उलट त्रास होतोय, असं त्यांनी म्हटलं होतं.