पाकिस्तानच्या खेळाडूंची अक्कल जेव्हा पेंड खायला जाते, तेव्हा…

आबुधाबी | पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातस एक विचित्र प्रकार घडला. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात विचित्र रनआऊट ठरला आहे. 

53 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अझर अलीने चेंडू सीमारेषेकडे मारला. अझर अली आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या असाद शफिकला तो चौकार गेला असं वाटलं त्यामुळे ते चर्चा करत धावपट्टीच्या मधोमध थांबले. 

दुसरीकडे चेंडू सीमारेषेच्या अलिकडेच थांबला होता. क्षेत्ररक्षक मिचेल स्टार्कने चेंडू यष्टीरक्षक टीम पेनकडे दिला आणि पेनने क्षणाचाही विलंब न लावता यष्ट्या उडवल्या.

यष्ट्या उडवताच आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. अझर अली आणि असाद शफिकला हे कशाचा जल्लोष करत आहेत हे कळेना, मात्र घोडचूक लक्षात येताच त्यानं पव्हेलियनचा रस्ता धरला. 

पाहा व्हीडिओ-

 

https://twitter.com/lonesuhail786/status/1052828068694319104

 

महत्त्वाच्या बातम्या-

-…तरीही शिवसेना भाजपसोबत सत्तेत का राहिली?; उद्धव ठाकरेंनी सांगितलं उत्तर

-मार्क झुकरबर्कलाच ‘फेसबुक’वरुन हटवण्याच्या हालचाली सुरु!

-भाजप आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली, पोलिसांना अश्रू अनावर

-भाजपच्या गोपनीय सर्व्हेवर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

-मला कोणत्याही पदाची लालसा नाही, मी किंगमेकर आहे- पंकजा मुंडे