लाहोर | कोरोनाचा सामना करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध आम्हालाही द्या, अशी विनंती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडे केली आहे.
पाकिस्तानात आतापर्यंत 6 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या महामारीला रोखण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतापुढे मदतीची याचना केली आहे .
पाकिस्तानासोबतच जगभरातील अनेक देशांना भारताकडे आशा आहे. यामध्ये इटली आणि ब्रिटनसारख्या बलाढ्य देशांचाही समावेश आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन भारताने सुरुवातीला या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, भारताकडे आवश्यकतेपेक्षा अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याने सरकारने यावरील बंदी उठवली आहे.
दरम्यान, कोरोनावर आतापर्यंत कोणतंही औषध किंवा लस निघालेली नाही. मात्र कोरोनावर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा सकारात्मक परिणाम पडत असल्याचं समोर आलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मुंबईचं इटली होणार, आपल्याला खंबीर नेतृत्वाची गरज- रंगोली चंडेल
भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे संशोधक म्हणतात…
महत्वाच्या बातम्या-
मला माफ करा मी हरलो; जितेंद्र आव्हाड यांची भावनिक फेसबुक पोस्ट
‘WHO’ला पाठवला जाणारा निधी तात्पुरता थांबवा; ट्रम्प यांचा प्रशासनाला आदेश
मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजारांच्या जवळ
Comments are closed.