बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! रद्द झालेल्या न्युझीलंड दौऱ्यातील पाकिस्तानच्या सुरक्षा पोलिसांनी ‘इतक्या’ लाखांची बिर्याणी केली फस्त

इस्लामाबाद | जगभरात सध्या पाकिस्तान आणि त्यांच्या देशातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड क्रिकेट संघ वनडे सामना खेळवणार होता, पण तो काही कारणानं रद्द झाला होता त्यामुळं पाकिस्तानची नाचक्की झाली होती. आता पुन्हा एकदा न्युझीलंडने टी- 20 सामन्यासाठी काही तास शिल्लक असतानाच मालिका रद्द केली आहे.

पाकिस्तानमधील सुरक्षेच्या कारणावरून न्यूझीलंडने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. मालिकेसाठी पुरेपूर योग्य सुरक्षा नसण्याच्या अभावी न्युझीलंड क्रिकेट बोर्डानं निर्णय घेतला आहे. न्युझीलंडच्या निर्णयानंतर लगेचच इंग्लंडने देखील त्यांचा आगामी पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. मात्र, यासर्व विषयानंतर आता पाकिस्तान पोलिसांचा एक हास्यास्पद प्रकार उघडकीस आला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पाकिस्तान पोलिसांनी 8 दिवसांत तब्बल 27 लाख रूपयांची बिर्याणी खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील माहिती पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने दिली आहे. आधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नाचक्की होत असताना त्यातच पाकिस्तान पोलिसांचं हासू होत आहे.

दरम्यान, इस्लामाबादमधील हॉटेल सेरेनामध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाचा मुक्काम होता. न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या सुरक्षेसाठी 500 पोलीस तैनात होते. त्यात 5 पोलीस अधिक्षकांसह सहाय्यक अधिकाऱ्यांचा समावेश केला होता. या 500 पोलिसांनी 8 दिवसांत 27 लाखांची बिर्याणी खाल्ल्याने या विषयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

थोडक्यात बातम्या –

“…म्हणून मी ललित मोदींचं कौतुक केलं, बाकी काही नाही”

“दिल्ली, युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना …”

धक्कादायक! पाकड्यांनी भारतात पाठवलेत अफगाण दहशतवादी???; ‘या’ भागांवर हल्ला होण्याची शक्यता!

“अनिल देशमुख ईडीला येडं समजतात, राज्याचा ‘झू’ करून टाकलाय”

पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे नंतर पुढचा जन्म रस्ते काॅन्ट्रॅक्टरचा मिळू दे- हेमंत ढोमे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More