IND PAK - बिटिंग रिट्रीट सुरु असताना पाकिस्तानचा जवान जमिनीवर पडला!
- विदेश

बिटिंग रिट्रीट सुरु असताना पाकिस्तानचा जवान जमिनीवर पडला!

नवी दिल्ली | भारत पाकिस्तान सीमेवरील हुसैनीवालामध्ये बिटिंग रिट्रीटदरम्यान पाकिस्तानचा जवान पडला. यावेळी उपस्थित नागरिकाच्या मोबाईलमध्ये हा क्षण कैद झालाय. 

वाघा बॉर्डरवर रोज सायंकाळी बिटिंग रिट्रिटचा कार्यक्रम पार पडतो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी विकेंडला मोठी गर्दी असते. रविवारी उत्साहाच्या भरात पाकिस्तानी जवानाकडून मोठी चूक झाली.

दरम्यान, पडल्यानंतर पाकिस्तानी जवानाने झटकन उठून रिट्रीट पूर्ण केलं, मात्र आता हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय.

संपूर्ण बातमीसाठी व्हिडिओ पाहा-

 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा