बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाच्या संकटात पाकिस्तान भारतासोबत ठामपणे उभा”

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातलं असून कित्येकांनी आतापर्यंत या लाटेमध्ये आपले जीव गमावला आहे. कोरोनाचं संकट असताना ऑक्सिजनच्या तुटवड्याने आता मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशातच शेजारी राष्ट्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या बाजुने ठामपणे असल्याचं म्हटलं आहे.

मी भारतीयांप्रति एकता व्यक्त करू इच्छितो. ते कोरोनाच्या घातक लाटेचा सामना करत आहेत. आम्ही आमच्या शेजारील आणि जगातील कोरोनाने पीडित सर्व लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो, असं इम्रान खान म्हणाले. त्यासोबतच आपण सर्वांनी एकत्रितपणे या जागतिक संकटाचा सामना करायला हवा, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

इम्रान खान यांच्यासोबतच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही भारतीयांप्रति सहानुभूती व्यक्त केली आहे.कोविड-19 संक्रमणाने आपल्या भागात कहर केला आहे. सध्याच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीयांप्रति समर्थन व्यक्त करतो. तसेच पाकिस्तानातील कोलांच्या वतीने, मी भारतात प्रभावित कुटुंबीयां प्रति सहानुभूती व्यक्त करतो.की मानवी प्रश्नांवर राजकारणापलिकडे जाऊन पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचं कुरेशी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इमरान खान यांनी हे ट्विट केल्यानंतर भारतीय ट्विटर धारकांनी त्यांचे आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिकही भारतातील कोरोना संकटाबाबत चर्च करत आहे. भारतातही ट्विटरवर #PakistanstandswithIndia ट्रेंड करत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

500 रुपयांच्या पैंजेसाठी मुलीला… तरुणाला भोगावा लागली मोठी शिक्षा!

तु माझा बाप आहेस का?, ‘या कारणामुळे दोन पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी

तीन दिवसात होता विवाह मात्र… असं कुणासोबतच घडू नये!

“आमच्याकडून 50 रुग्णावाहिका पाठवू इच्छितो”; पाकिस्तानचं पंतप्रधान मोदींना पत्र 

यवतमाळमधील धक्कदायक प्रकार; दारूची तलफ भागवण्यासाठी केलं असं काही की….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More