बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताविरूद्ध पाकिस्तानचे ‘हे’ 11 खेळाडू मैदानात उतरणार; पाकिस्तानचा संघ जाहीर

मुंबई | टी ट्वेंटी विश्वचषक सामन्याला युएईमध्ये सुरूवात झाली आहे. भारतीय संघाचे दोन्ही सराव सामने पुर्ण झाले आहे. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन तगड्या संघाचा पराभव केला आहे. त्यानंतर आता भारताचा सामना येत्या 24 तारखेला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. अशातच आता सामन्याआधीच पाकिस्तानचा संघ जाहीर झाला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता टी ट्वेंटी सामना खेळवला जाईल. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. अशातच आता सामन्याच्या एक दिवसाआगोदरच पाकिस्तानने आपले 11 खेळाडू जाहीर केले आहेत.

पाकिस्तानचा संघ बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळेल. आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, मोहम्मद रिजवान, शादाब खान, शोएब मलिक, हारिस रऊफ, ,इमाद वसिम, मोहम्मद हफीज, हसन अली आणि शाहीन अफ्रिदी, असे 11 जण भारताविरूद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काय झालं, तो इतिहास होता. आम्ही आता पुढचा विचार करत आहोत. युएई पाकिस्तानचं होम ग्राऊंड असल्याने तेथील परिस्थिती आम्हाला माहित आहे. त्यामुळे यावेळेस भारताचा पराभव होईल, असंही बाबर आझम म्हणाला होता. मात्र भारतीय संघ देखील 6-0 करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

‘तुझी मर्जी म्हणजे तुुझा अधिकार होऊ शकत नाही’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘हे आमदार, खासदार सो कॉल्ड जी माकडं आहेत…’, उद्यनराजे संतापले

“आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे”, मुख्यमंत्र्यांनी लगावला परमबीर सिंगांना टोला

‘आर्यन खानला गांजा दिला होता, पण….’, अनन्या पांडेचा मोठा खुलासा

‘…ते आपल्याला मोडून काढायचं आहे’, मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ महत्त्वाचा निर्धार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More