बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तान टीम इंडियाला नक्की हरवणार- इम्रान खान

नवी दिल्ली | टी-20 विश्वचषक स्पर्धेत म्हणजेच आज भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेट सामना होत आहे. 2019 च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात सामना झाला होता.

सध्या क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. अशात पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांनी बाबर आजम अँड कंपनीला एक मेसेज पाठवला आहे. पाकिस्तान यावेळेस भारताला नक्की पराभूत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संघात प्रतिभावान खेळाडू आहेत आणि ते भारताला पराभूत करतील. इंशा-अल्लाह उद्या पाकिस्तान नक्की भारताला पराभूत करेल, असं मत इम्रान खान यांनी Geo TVशी बोलताना व्यक्त केलं आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी सायंकाळी एकमेकांना भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे आणि यावेळी 20 हजारापर्यंत प्रेक्षकही उपस्थित राहणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘…तर आम्हाला थेट मॅसेज करा’; पाकिस्तान टीमसाठी झोमॅटोचं ट्विट

‘या’ तारखेपासून पुन्हा पाऊस बरसणार; शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन

‘…तर पुन्हा कोरोनाची भयावह लाट येऊ शकते’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन, म्हणाले…

भार-पाक मॅच देशहितविरोधी म्हणणाऱ्या रामदेव बाबांना नवाब मलिकांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More