बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान भारताला हरवणार’; शोएब अख्तर पुन्हा बरळला

मुंबई | यंदाच्या वर्षी आयसीसीचा टी-20 विश्वचषकाची मोठी स्पर्धा रंगणार आहे. आयपीएलचा उर्वरित हंगाम उरकल्यानंतर विश्वचषक होणार आहे. मात्र स्पर्धेच्या अगोदर आजी-माजी क्रिकेटपटूंनी तर्क-वितर्क लावायला सुरूवात केली आहे. अशातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारत-पाक सामन्याबाबत भविष्यवाणी केली आहे.

मला वाटते टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तान आणि भारत खेळतील आणि भारत पाकिस्तानकडून पराभूत होईल. यूएईमधील अटी भारत आणि पाकिस्तान या दोघांना अनुकूल असतील, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. मात्र आत्ता पर्यंतचा इतिहास पाहता भारत विश्वचषकामध्ये पाकिस्तानसोबत एकदाही हरलेला नाही.

विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया अंतिम सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानशी टक्कर घेईल. मात्र यावेळी पाकिस्तानी संघ भारताला मागे टाकेल, असंही शोएब अख्तर म्हणाला आहे. स्पोर्ट्स तक यूट्यूब वाहिनीवर बोलत होता.

दरम्यान, पाकिस्तानचा अखेरचा टी-20 विश्वचषक सामना 2016च्या हंगामात कोलकाता येथे झाला होता. यात भारताने पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय मिळवला होता. मात्र भारतीयांच्या मनात सल आहे ती 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा 180 धावांनी पराभव झाला होता.

थोडक्यात बातम्या- 

“न्यूड ऑडिशनला नकार दिल्यानं मला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती”

ब्रेकिंग! पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पेट्रोल, डिझेल न देण्याचा निर्णय

कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, सांगलीतील ‘या’ गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा!

इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात आणखी एक याचिक दाखल

ह्रदयद्रावक! पुराचं पाणी शिरल्याने चिपळूणच्या कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More