बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मॅच इंग्लंड-न्यूझिलंडची अन् टेन्शन पाकिस्तानला….!

लंडन |  आज(बुधवार) इंग्लंड-न्यूझिलंडमध्ये क्रिकेट विश्वचषकातला रोमांचकारी सामना रंगतो आहे. मात्र या सामन्याचं टेन्शन पाकिस्तानने घेतलं आहे. कारणही तसंच आहे फक्त इंग्लंड आणि न्यूझिलंडचेच नाही तर पाकिस्तानचंही भवितव्य या सामन्यावर अवलंबून आहे.

आजच्या सामन्यामध्ये जर न्यूझिलंडने इंग्लंडचा पराभव केला तर पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये जाण्याचा मार्ग सोपा होईल. पाकिस्तानने पुढच्या होणाऱ्या सामन्यात बांगलादेशला हरवलं तर पाक सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतं.

दुसरीकडे आज जर इंग्लंडने न्यूझिलंडला पराभूत केलं तर पाकिस्तानच्या आशा संपुष्टात येतील आणि त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागेल.

दरम्यान, आज पाकिस्तानचे चाहते न्यूझिलंडला चिअरअप करताना दिसून येतील. न्यूझिलंड जिंकावे अशी मनोमन अपेक्षा पाकिस्तानी चाहते करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

टिक टॉकची जादू… ३ वर्षापूर्वी घर सोडून गेलेला नवरा बायकोला परत मिळाला!

-“अनेकदा लढाईत मी एकटा पडलो पण लढत राहिलो याचा अभिमान”

-ट्वीटरवरून राहुल गांधींनी दिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा; पुढच्या अध्यक्षपदाच्या नावाचा पेच कायम

-वंचितने दिली काँग्रेसला ऑफर; विधानसभेसाठी आम्ही ‘इतक्या’ जागा सोडू

-६ भाषांसाठी अभिमानाची गोष्ट; मराठीचाही समावेश!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More