नरेंद्र मोदींशिवाय चांगला पंतप्रधान पाकिस्तानला मिळू शकत नाही- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | पाकिस्तानला मोदींपेक्षा चांगला पंतप्रधान मिळू शकत नाही. मोदी पाकिस्तानचा अजेंडा लागू करत आहेत, असा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

मोदींचे समर्थन करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याचा आधार घेत केजरीवालांनी नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे.

पुलवामा हल्ल्यासारख्या घटना निवडणुकीपूर्वी घडवल्या गेल्या. मोदी आणि इम्रान खान यांच्यात काय शिजतंय? असा सवाल देखील केजरीवालांनी उपस्थित केलाय.

चार आठवडयांपूर्वी दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण इम्रान खान यांची मोदींना परत पंतप्रधानपदावर बघण्याची इच्छा निर्माण होणं हे कशाचं द्योतक आहे, असं केजरीवालांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-आशिष शेलार-सचिन सावंतांमध्ये जुंपली! ट्वीटरच्या माध्यमातून रंगलं शाब्दिक युद्ध

देशाचे तुकडे होऊ देणार नाही- नरेंद्र मोदी

-‘काँग्रेस गाढवांचा पक्ष’; सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची काँग्रेसवर सडकून टीका

-आघाडीकडून भुुजबळांनी सांगितली पंतप्रधानपदासाठी ‘ही’ पाच नाव

-मोदींपेक्षा नितीन गडकरी पंतप्रधानपदासाठी योग्य- अनुराग कश्यप