पाकिस्तानी खेळाडूचे लाजिरवाणे कृत्य; इटलीत चोरी करून फरार!

Pakistan | पाकिस्तान हा देश आणि तेथील खेळाडू नेहमी काही ना कारणांमुळे चर्चेत असतात. मैदानात हाणामारी, असो की मग पंचांसोबतचा वाद याबाबतीत शेजारील देशातील खेळाडू नेहमीच आघाडीवर असतात. आता शेजारच्या देशातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी बॉक्सर इटलीमध्ये त्याच्याच जोडीदाराच्या पर्समधून पैसे चोरून पळून गेल्याचे सांगण्यात आले आहे.

खरं तर पाकिस्तानचा पाच सदस्यीय संघ ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी इटलीला पोहोचला होता, तिथे ही चोरीची घटना घडली. हे लाजिरवाणे कृत्य पाकिस्तानी बॉक्सर जोहेब रशीद याने केले. पाकिस्तानचा बॉक्सर जोहेब रशीद इटलीला पोहोचताच चोर झाला. जोहेबवर त्याच्या जोडीदाराच्या पर्समधून पैसे चोरून इटलीत पळून गेल्याचा आरोप आहे.

इटलीत चोरी करून फरार!

जोहेब रशीद हा पाकिस्तानच्या पाच सदस्यीय बॉक्सिंग संघाचा भाग होता, जो ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी इटलीला गेला होता. पण जोहेबने इटलीमध्ये आपल्या चाहत्यांना लाज वाटेल असे कृत्य केले. जोहेबवर इटलीमध्ये आपल्या जोडीदाराच्या पर्समधून पैसे चोरून फरार झाल्याचा आरोप आहे.

पाकिस्तानच्या बॉक्सिंग महासंघाने मंगळवारी ही माहिती दिली. महासंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी पाकिस्तानी दूतावासाला कळवले असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जोहेबची सहकारी महिला बॉक्सर लॉरा इकराम प्रशिक्षणासाठी बाहेर गेली होती. दरम्यान, जोहेबने हॉटेलच्या रिसेप्शनमधून तिच्या खोलीची चावी घेतली आणि तिच्या पर्समध्ये ठेवलेले पैसे पळवले, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

Pakistan च्या खेळाडूचे लाजिरवाणे कृत्य

पाकिस्तानच्या बॉक्सिंग महासंघाचे सचिव कर्नल नासिर अहमद म्हणाले की, महासंघ आणि देशासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. जोहेबला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी पाच सदस्यीय संघासह तेथे पाठवण्यात आले होते, परंतु असे करून त्याने विश्वासाला तडा दिला आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. पण सध्या तो कोणाच्या संपर्कात नाही.

इटलीमध्ये हे कृत्य करणाऱ्या पाकिस्तानी बॉक्सरने गेल्या वर्षी झालेल्या आशिया बॉक्सिंग स्पर्धेत पाकिस्तानला कांस्य पदक मिळवून दिले होते. कांस्य पदक जिंकल्यानंतर जोहेबची पाकिस्तानमध्ये खूप चर्चा झाली. परंतु त्याने चोरीसारखे वाईट कृत्य करून आपल्या देशाचे नाव खराब केले.

News Title- Pakistani boxer Zohaib Rasheed stole money from his teammate’s bag in Italy
महत्त्वाच्या बातम्या –

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आठवली ‘देशभक्ती’, खेळाडूंना दिला गंभीर इशारा!

Facebook आणि Instagram डाऊन अन् मार्क झुकरबर्गचं मोठं नुकसान!

मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले

850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय