बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शाहरुख खान सर तुम्ही भारत सोडून कुटूंबासोबत पाकिस्तानात येऊन स्थिर व्हा.”

मुंबई | मुंबईत झालेल्या कार्डेलिया क्रुझ पार्टीवर टाकलेल्या छाप्यात बॉलीवूड किंगखानच्या मुलाला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादीबरोबरच बॉलीवूडच्या एका गटाने एनसीबीवर संशय व्यक्त केला आहे. आर्यनला मुद्दाम ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचं या गटाचं मत आहे.

क्रुझ रेव्ह पार्टीचं हे प्रकरण भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये देखील गाजत आहे. अशातच आता पाकिस्तानने शाहरूखला तिथं येऊन राहण्यासाठी हाक दिली आहे. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नसले तरी त्यासंबंधीचं संभाषण सापडलं आहे. यामुळे एनसीबी आर्यनला सोडत नाही तर दुसरीकडे शाहरुख त्याला सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानमधील सेलिब्रिटी आणि अभिनेते या प्रकरणी शाहरुख खानचे समर्थन करत आहेत. पाकिस्तानचा प्रसिद्ध अँकर वकार जाका याने ट्विट करत शाहरूखला समर्थन दर्शवले आहे. शाहरुख खान सर तुम्ही भारत सोडून कुटूंबासोबत पाकिस्तानात येऊन स्थिर व्हा. मोदी सरकार तुमच्या कुटूंबासोबत जे करत आहे ते अत्यंत चुकीचं आहे, मी शाहरुखानसोबत उभा आहे.’ असं ट्विट जाकाने केलं आहे. या ट्विटमुळं तो ट्रोल देखील झाला आहे.

अनेकांनी जाकाच्या या ट्विटचं समर्थन केलं आहे तर काहींनी त्याची खिल्ली उडवली आहे. काही युजर्सने पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीची दयनीय अवस्था सांगितली आहे. फुकरान नावाच्या एका युजरने म्हटलं आहे की, शाहरुखला इथं सिनेमे मिळणार नाहीत. सर्व प्रोड्युसर एकत्र येऊन पण त्याची फी देऊ शकणार नाहीत. एका युजरने म्हटलं आहे की, शाहरूखची पत्नी हिंदू आहे आणि ते हिंदूंचे सर्व सण साजरे करतात. जो व्यक्ती पत्नीच्या धर्माचादेखील आदर करतो तो एक खरा माणूस आहे.

थोडक्यात बातम्या

भारत कालची मॅच हरल्यानंतर पंजाबमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

परिक्षेत विद्यार्थ्याने लिहिलं असं काही की, वाचून शिक्षक गेले कोमात

मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘माझ्या मूळ गावी जाऊन…’

भारतीय संघाची चिंता वाढली! ‘हा’ प्रसिद्ध खेळाडू पोहोचला रूग्णालयात

एकीकडे पाकिस्तान मैदानावर इतिहास रचत होता, तर दुसरीकडे पाकिस्तानात 10 जणांचा मृत्यु झाला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More