बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या हद्दीत चुकून घुसला पाकिस्तानी मुलगा, त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!

नवी दिल्ली | राजस्थानच्या बारमेर जिल्ह्याच्या सीमेमध्ये चुकून आलेल्या एका पाकिस्तानी मुलाला भारतीय सुरक्षा दलानं पाकिस्तानात परत पाठवलं आहे. भारतीय सुरक्षा दलानं फ्लॅग बैठक घेऊन पाकिस्तानी रेंजर्सला बोलावलं आणि त्यानंतर त्या निष्पाप मुलाला पाकिस्तानच्या स्वाधीन केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पाकिस्तान निवासी करीम यानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. चुकून भारताच्या सीमेमध्ये आलेल्या करीमला सीमा सुरक्षा दलानं विचारपूस केली, त्याला पोटभर जेवायला दिलं. त्यानंतर त्याला पाकिस्तानच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता आठ वर्षाचा पाकिस्तानी मुलगा करीम हा चुकून भारताच्या हद्दीत आला होता.

सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्यानं स्वतःला पाकिस्तानी असल्याचं सांगितलं. यानंतर भारत-पाक जवानांमध्ये संध्याकाळी सात वाजता बैठक झाली. त्यानंतर त्याला सुखरूप पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आलं.

दरम्यान, बारमेर जिल्ह्यातील सज्जन पारचा रहिवासी असलेला एक तरूण गमराराम सहा महिन्यांपासून पाकिस्तानी तुरुंगात आहे. मात्र, पाकिस्तान त्याला परत पाठवण्यासाठी काहीच हालचाल करत नाही. बारमेर जिल्ह्यातील बीजराड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सज्जन भागातील रहिवासी असलेला गेमराराम पाच नोव्हेंबरला रात्रीच्या अंधारात तारांच्या पलीकडं असलेल्या पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. पाकिस्तानच्या सीमेत जाताच 6 नोव्हेंबरला पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला पकडलं. पाकिस्तानी रेंजर्सनी भारताच्या बीएफएसच्या अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली आणि त्याला तुरुंगात बंद केलं. पाकिस्तानी रेंजर्सनी या गोष्टीची माहिती बीएसएफला तेव्हा दिली जेव्हा पाकिस्तानच्या हद्दीतून 84 बकऱ्या भारताच्या हद्दीत आल्या होत्या. बकऱ्या सीमेपार बारमेरमध्ये आल्यानंतर बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये संभाषण झालं. त्यावेळी गेमराराम नावाचा एक तरूण त्यांच्या ताब्यात असून तो सध्या तुरुंगात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या

“पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोरोनाशी लढतोय, तरीही धीरोदत्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय”

“तुम्ही फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?”

मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं

“रिषभ पंतला खेळताना पाहिलं की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात”

रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु, पुण्यातील रुग्णालयाची संभाजी ब्रिगेडकडून लाईव्ह पोलखोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More