बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानची जगभर नाचक्की! ट्विट करत खुद्द अधिकाऱ्यांनीच केली पोलखोल

नवी दिल्ली | पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक स्थिती मागील काही दिवसांपासून बिघडल्याची चर्चा आहे. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) कधीच ही गोष्ट मान्य करताना दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते पाकिस्तानची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचंच भासवतात. मात्र, आता पाकिस्तानची दयनीय परिस्थिती सांगणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ज्यामुळे इम्रान खानचं खोटं जगासमोर आलं आहे.

सर्बिया येथील पाकिस्तानी दुतावासाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. पाकिस्तानी दुतावासाने व्हिडीओ पोस्ट करून म्हटलं आहे, महागाईने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान किती दिवस सरकारी अधिकाऱ्यांकडून विना पगाराच्या कामाची अपेक्षा करणार आहेत, असा प्रश्न ट्विटमध्ये विचारला आहे.

पुढे ट्विट मध्ये म्हटलं आहे, ‘आम्हाला पाकिस्तानसाठी विनापगाराचे काम करून 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. आमच्या मुलांना शाळेची फि न भरल्याने शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे,’ असं म्हणत पुढे ‘हाच नविन पाकिस्तान आहे का?’ असा प्रश्न देखील पाकिस्तान दुतावासाच्या अकांउटवरून केलेल्या ट्विटमध्ये विचारला आहे.

दरम्यान, पाकिस्तानने याबाबत स्पष्टीकरण देताना पाकिस्तानचे सर्व अधिकृत ट्विटर हॅंडल्स हॅक करण्यात आले होते. त्यामुळे या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटचा पाकिस्तान दुतावासासोबत काहिही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. असं असलं तरी अनेक पाकिस्तानी नागरिकांनी या ट्विटला दिलेल्या प्रतिक्रियांवरून सत्य समोर येत आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

“लड़ोगे नहीं तो जीताेगे कैसे?”, प्रियंका गांधींचा पारा चढला

‘मिस यु आई’ म्हणत एअरपोर्टवर गेला अन् आईनी चपलेने धुतलं; पाहा मजेशीर व्हिडीओ

“अनिल परबांची तेवढी ताकद नाही, मंत्री म्हणून जी संविधानिक उंची लागते ती…”

“तेव्हा मला माझीच लाज वाटली, कोणीतरी कानाखाली मारल्यासारखं वाटलं”

Omicron मुळे तिसरी लाट येणार?, आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More