बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ओ भाई… मारो मुझे… मारो” म्हणणारा मुलगा आठवतोय? तो आता परत आलाय, पाहा काय म्हणाला

नवी दिल्ली | सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊन त्याचं मीम बनवलं जातं. याचंच एक उदाहरण मागच्या विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान समोर आलं होतं. भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर “ओ भाई, मारो मुझे” असं म्हणणाऱ्या मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता याच मुलाचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे.

2019ला पार पडलेल्या विश्वचषक सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवत सामना जिंकला होता. यादरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंवर खराब खेळीवरून जोरदार टीका करण्यात आली होती. यातच एका पाकिस्तानी चाहत्याचा भावुक होऊन “मारो मुझे” असं म्हणतानाचा व्हिडीओ तर जबरदस्त व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच्या या डॉयलॉगचं मीम बनवलं आणि सगळीकडे तेच मीम दिसू लागलं.

या चाहत्याचे नाव आहे मोमीन सकीब. मागील विश्वचषकात जेव्हा भारताने पाकिस्तानला हरवले तेव्हा मोमीन प्रचंड भावूक झाला होता. त्यामुळे त्याने पाकिस्तानच्या खेळांडूवर रोष व्यक्त तर केलाच पण त्यातून त्याच क्रिकेटवरचं प्रेमही दिसून आलं. तो रागावून बोलत असला तरी अतिशय मनापासून बोलत होता. बोलताना तो रडतही होता. हेच लोकांना आवडलं आणि मोमीन व्हायरल झाला.

आता रविवारी भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील. या सामन्याची सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी मोमीनने व्हिडीओत हा सामना पाकिस्तानसाठी जिंकणं खूप महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. शिवाय त्याने प्रेक्षकांना तुम्ही या भावनांनी भरपूर अशा सामन्यासाठी तयार आहात का? असा प्रश्नही विचारला आहे.

पाहा व्हिडीओ

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Momin Saqib (@mominsaqib)

थोडक्यात बातम्या-

भरसभेत छगन भुजबळांनी दिलं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान, म्हणाले…

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…, नितीन राऊतांच्या ट्विटवर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रीया

पंतप्रधानांचा हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन्…

गौतम गंभीर म्हणतो,”हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नाही तर…”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More