बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानी तरुणी पडली भारतीय तरुणाच्या प्रेमात, देशात येण्यासाठी थेट मोदींकडे विनंती

नवी दिल्ली | लोक अनेक वेळा प्रेमात काही तरी धक्कादायक नाही तर लोकांना हैराण करण्यासारखं कृत्य करतात. अशातच पाकिस्तानमधील एका तरुणीचं प्रेम भारतातील एका तरुणावर जडल्याने तिने भारतात येण्यासाठी थेट मोदींकडे विनंती केली असल्याची घटना समोर आली आहे.

पाकिस्तानच्या कराची येथे राहणाऱ्या सुमन रंतीलाल हिला दीड वर्षापूर्वी भारतातील रहिवासी असलेल्या अमितवर प्रेम झालं. हे दोघंही तेव्हापासूनच प्रेमाच्या बंधनात बांधले गेले आहेत. याच कारणामुळे सुमननं बॉर्डर क्रॉस करण्यासाठी मोदी सरकारकडे विशेष परवानगी मागितली आहे.

सुमन एक शिक्षिका आहे. ती सध्या MPhil करत आहे. सुमननं पाकिस्तानात असलेल्या भारतीय उच्चायोगात आपल्या ट्रॅव्हल व्हिसासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जमा केली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रकोपामुळे तिला व्हिसा मिळालेला नाही. सुमनचा बॉयफ्रेंड पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्याच्या श्री हरगोबिंदपुर येथे राहतो. साल 2019 मध्ये सुमन आणि अमित फेसबुकद्वारे भेटले होते. यानंतर त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि आता या दोघांनाही लग्नगाठ बांधायची आहे.

दरम्यान, 2020 पासूनच कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता भारत आणि पाकिस्तान दरम्यान प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. याच कारणामुळे सुमनला भारतात प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे मंत्री एकत्र येतात अन् मराठा मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेतात”

“…त्यामुळे 2024 साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत मोदींनी खुलासा करावा”

मेंदूवर परिणाम करणारा दुर्मिळ कोरोना; ‘या’ राज्यात सापडला पहिला रूग्ण

“फडणवीस म्हणाले होते, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, त्याचं काय झालं?”

नवऱ्याने अन् घरातल्यांनी साथ सोडली, 6 महिन्याच्या मुलासह घराबाहेर पडलेली महिला बनली पोलीस उपनिरीक्षक

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More