इस्लामाबाद | पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हाफिज सईदला पंतप्रधानपदाचे वेध लागलेत. ‘मिल्ली मुस्लीम लीग पाकिस्तान’ या नावाने राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी, यासाठी त्याने निवडणूक आयोगाकडे अर्ज केलाय.
पनामा प्रकरणामुळे नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावं लागलंय. तर विरोधी पक्षनेते इम्रान खानवर त्यांच्याच पक्षातील महिला नेत्याने अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप करुन पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हीच योग्य वेळ असल्याचं ठरवून हाफिज राजकारणात उतरणार असल्याचं समजतंय.
Comments are closed.