बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानच्या बाबर आझमची तुफानी खेळी, 19 चेंडूत चोपल्या 84 धावा!

लाहोर | आयसीसीच्या जागतिक एकदिवसीय सामन्यातील फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझमनं बुधवारी एक वादळी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्यानं दमदार शतक ठोकलं. तर पाकिस्तानच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची 7 वर्षात कधी नव्हे ती धुलाई या सामन्यात केली आहे.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी 203 धावांची आक्रमक खेळी केली. जेनेमॅन मलन आणि मार्करम या दोघांनी फटकेबाजी सुरू केली. या दोघांनी 108 धावांची भागिदारी केली. मार्करमने 31 चेंडूत 63 धावा केल्या. तर डुसेनने शेवटी 34 धावा करून धावसंख्या 200 पार केली. याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 204 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामवीरांनी वादळी खेळी केली. पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम याने 59 चेंडूत 122 धावांची तुफानी खेळी केली. यात त्याने 15 चौकार तर 4 गगनचुंबी षटकार खेचले. तर त्याला मोहम्मद रिझवानने मोलाची साथ दिली. त्यानं देखील 47 चेंडूत 73 धावा केल्या. त्यानं 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्या दोघांंनी 197 धावांची विक्रमी भागेदारी केली. 200+ धावसंख्येचा पाठलाग करताना फक्त 1 गडी गमावून सामना जिंकणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची तुलना भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली सोबत केली जाते. तसेच दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची इतकी धुलाई गेल्या 7 वर्षात कोणीही केली नव्हती.

थोडक्यात बातम्या-

चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे- अजित पवार

“मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय”

पुणे हादरलं! निवृत्त पोलीस अन् गुन्हेगारात वाद झाल्यानंतर गुन्हेगाराचा विचित्र मृत्यू

संजय राऊतांनंतर राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर बेळगावात, मराठी माणसाचा प्रचार करणार!

“ज्यांनी भांडणं लावून लोकांची घरं फोडली, त्यांच्या घरात आता टोकाची भाडणं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More