बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फेक फिल्डिंगमुळे पाकिस्तानचा फखर जमान द्विशतकाच्या तोंडावर आऊट, मुंबई इंडियन्ससच्या खेळाडूला शिक्षा

जोहान्सबर्ग | पाकिस्तानचा ओपनर फखर जमान याने 155 बॉलमध्ये 193 रन काढले. त्याच्या या मोठ्या खेळीनंतरही दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17 रनने पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा बॅटींग करताना 6 बाद 341 धावा केल्या. फखरच्या शतकानंतरही पाकिस्तानला 9 बाद 324 पर्यंत मजल मारता आली.

फखर जमानचं डबल शतक होणार असंच सर्वांना वाटत होतं. त्यावेळी मुंबई इंडियन्स कडून खेळणाऱ्या क्विंटन डिकॉक याच्या फेक फिल्डिंगमुळे फखर धावबाद झाला. क्विंटन डीकॉकने नॉन स्ट्राईकरकडे थ्रो करत असल्याचा इशारा केला. तो पाहून फखर धाव काढताना त्याचा वेग स्लो झाला. त्याचवेळी लाँग ऑनच्या फिल्डरनं सरळ थ्रो केला जो स्टंपला लागला. डि कॉकच्या या फेक फिल्डिंगमुळे त्याला आणि दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बवुमा याला दंड आकारण्यात आला आहे.

क्विंटन डी कॉकच्या या फेक फिल्डिंगमुळे पाकिस्तानच्या फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. या धावबादचा व्हिडीओ आता व्हायरल  झाला आहे. यामध्ये डिकॉक नॉन स्ट्रायकरच्या दिशेला बॉल थ्रो करण्याची सूचना करत आहे. त्याच दिशेनं हॅरीस रौफ पळत होता. डिकॉकने हा इशारा करताच फखर थोडा स्लो झाला. तो पाठीमागे वळून नॉन स्ट्रायकरच्या दिशेनं पाहात होता. त्याचवेळी तो पळत असलेल्या दिशेनं थ्रो आला आणि तो धावबाद झाला.

दरम्यान, अंपायरनी मैदानातच शिक्षा करण्याचा निर्णय घेतला असता तर पाकिस्तानला 5 रन अतिरिक्त मिळाले असते. त्याचबरोबर कदाचित फखरची डबल सेंच्युरी देखील झाली असती. पण, तसं काहीही झालं नाही. त्यामुळे या प्रकरणात पक्षपात झाल्याचा आरोप पाकिस्तानचे फॅन्स करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

इरा नाही तर ‘हे’ आहे आमिर खानच्या मुलीचं खरं नाव; चुकीचं नाव उच्चारल्यास आता 5 हजारांचा दंड

…म्हणून पतीनेच घराला लावली आग, पत्नी आणि मुलांचा मृत्यू

गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कोरोना लसीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ महत्वाची मागणी

50 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतणार 82 वर्षांच्या चौकीदाराची प्रेयसी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More