बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानने सामना जिंकल्यानंतर अशी होती पंतप्रधान इम्रान खान यांची प्रतिक्रीया

नवी दिल्ली | काल झालेल्या T-20 विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने भारताविरोधात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तब्बल 12 वेळा भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानला अखेर कालच्या सामन्यात दणदणीत विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्व पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांसह खेळांडूनीही या विजयाचा आनंद साजरा केलाय.

पाकिस्तान संघाच्या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही संघाचं ट्विट करून कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे. “सर्व पाकिस्तानी संघाचं अभिनंदन. बाबर आझम याचं विशेष अभिनंदन. कारण त्याने पुर्ण सामर्थ्याने संघाचं नेतृत्व केलं. रिझवान आणि शाहिन आफ्रिदी यांनी शानदार कामगिरी केली. देशाला तुमचा गर्व आहे.” अशा संदर्भातलं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

इम्रान खान यांनी आपल्या दालनात बसून टीव्हीवर कालच्या सामन्याचा आनंद घेतला. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राझा यांच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत एकत्र हा सामना पाहिला. इम्रान खान यांनी सामना पाहतानाचे फोटो शेअर करत खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

यासोबतच रमीज राझा यांनीही ट्विट करून खेळांडूचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले “हा पहिला विजय आहे. जबरदस्त. पण यातूनच विजयाच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. सर्व पाकिस्तानी जनतेसाठी अभिमानास्पद घटना देण्यासाठी सर्व खेळाडूंच अभिनंदन.” असं ट्विट करत रमीज राझा यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

…अन् सगळेच भारतीय खेळाडू बसले गुडघ्यावर! कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

अनन्या पांडे हाजिर हो!, ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या अडचणी संपता संपेना

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक, आता पंतसाठी उर्वशी थेट दुबईत स्टेडियमवर

झोमॅटो आणि पाकिस्तानी फुड डिलिव्हरी ॲपमध्ये ‘या’ कारणावरून रंगलंय शीतयुद्ध

संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More