बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या पराभवाचा पाकड्यांना आनंद! लाईव्ह कार्यक्रमात वसिम-वकार नाचले; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर न्यूझीलंडने देखील भारताचा 8 गडी राखून पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील लक्ष्य आता जवळपास संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये जल्लोष करण्यात आला आहे.

एका मुलाखती दरम्यान पाकचा माजी कर्णधार वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी भारताच्या पराभवावर जल्लोष करताना एका व्हिडीओ मध्ये दिसले. त्या लाईव्ह कार्यक्रमात वसीम अक्रम नाचत होता तर वकार युनूस टाळ्या वाजवताना दिसला. या कार्यक्रमात वहाब रियाझ आणि पाकचा माजी कर्णधार मिसबाह उल हक देखील उपस्थित होते. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारताकडे अजूनही उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. परंतु भारताने दोन्ही सामन्यात ज्या प्रकारे कामगिरी केली आहे. ते पाहता आता त्यांना काही चमत्कार करूनच उपांत्य फेरीत पोहचवू शकतो, असा शाहिद आफ्रिदीने ट्विट केला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानने जर न्यूझीलंड संघाला हरवलं तर भारताला पूढील सगळे सामने जिंकावे लागतील. शेवटी रनरेटच्या आधारे भारतीय संघ उंपात्य फेरीत प्रवेश करू शकतो. त्यामुळे भारताकडे अजूनही उंपात्य फेरीत प्रवेश करण्याची संधी उपलब्ध आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या – 

‘शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणार असाल तर…’; सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

‘सिर्फ घर नहीं, यहां तो पुरी सरकारही…’; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

‘भारतात कधी मुस्लीम व्होट बँक नव्हतीच, फक्त…’; असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक वक्तव्य

‘राज्यकर्ते काय लायकीचे आहेत हे…’; राजू शेट्टींची जहरी टीका

फडणवीसांच्या इशाऱ्याला नवाब मलिकांचं तीन शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More