Top News परभणी महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल पोलिसाचे अपशब्द, ऑडिओ क्लिप व्हायरल

परभणी | छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्याने अपशब्द वापरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालम शहरात हा प्रकार घडला असून त्याठिकाणी तणाव निर्माण झालाय. यामुळे संतप्त शिवप्रेमींनी पालम तहसील आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊंबाबत असं वक्तव्य करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करण्यात येतेय.

पालम पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या जगन्नाथ काळे या पोलिस कर्मचाऱ्याने फोन वर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल अश्लील शब्द वापरले. पोलीस कर्मचाऱ्याच्या आवाजातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीये. या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी पालम शहर व परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी मागणी केली आहे. आपल्या मागणीसाठी या नागरिकांनी शहरातून मोर्चाही काढला आहे.

पालम पोलिस स्टेशनमधील कर्मचारी जगन्नाथ काळे याने छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या बद्दल अश्लील शब्द वापरत, शिवीगाळ केल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर आलंय. सकाळपासून ही ऑडिओ क्लिप परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऑडिओ क्लिपमुळे सगळीकडे पसलण्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक शिवप्रेमी नागरिकांनी रस्त्यावर उतरत पालम शहर कडेकोट बंद करण्याची घोषणा केलीये. सोबत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून प्रशासनाने नागरिकांच्या भावनांची दखल घ्यावी. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही यावेळी शिवप्रेमींकडून देण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या-

‘ज्यांचं सरकार ते….’; राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून संजय राऊत यांचा भाजपला टोला

500 वर्षांची प्रतीक्षा संपली, भारतीयांच्या मनातलं स्वप्न पूर्ण झालं- योगी आदित्यनाथ

“आज अडवाणी घरात बसून हा सोहळा पाहत असतील”

ज्यावेळी मंदिर होईल त्याचवेळी अयोध्येत येईल म्हणणाऱ्या मोदींनी करून दाखवलं!

रामाचा वनवास संपला… मोदींच्या हस्ते मंदिराची पायाभरणी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या