बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाढत्या कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय!

मुंबई | कोरोना रूग्णसंख्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत असताना अनेक जिल्ह्यात प्रशासनामार्फत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाढती कोरोना रूग्णसंख्या लक्षात घेऊन, वसई- विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा 5 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी शाळा, जिल्हा परिषदेचा शाळा, सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा, निवासी शाळा, कोचिंग क्लासेस 5 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.

आजारी असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल, याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापकांनी घ्यावी, असं देखील या आदेशात म्हटलंय.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज तर कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. राज्यात आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. पुणे, मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील हृदयद्रावक घटना, कार धरणात कोसळल्याने आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

…तर अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत- अजित पवार

“फक्त सल्ले देण्याचे उद्योग नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या”

कोरोनाची लस घेतल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही करु नका; WHOनं दिला महत्त्वाचा इशारा

नाव न घेता उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना झापलं!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More