पालघर | पालघरमधील वाडा येथे महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील तब्बल 50 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचं कळतंय.
पालघरमधील पिवळी या गावातून वाडाच्या दिशेने मंगळवारी सकाळी 6. 30 वाजता ही बस निघाली होती. यावेळी या बसमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आणि इतर काही शाळांमधील विद्यार्थी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
एसटी भरधाव वेगात पिवळी गावातून वडाकडे जात असताना जांभूळ पाडा येथे गतिरोधकावर आदळली. या धडकेत चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उतरून हा अपघात झाल्याचं समजतंय.
दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या 50 विद्यार्थ्यांवर सध्या वाडा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–“मी विमान पाठवतो, या पाहा आणि मग बोला”
-…त्यावेळी मी देखील अनेक रात्री रडत घालवल्या आहेत- विद्या बालन
-बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातच विखे पाटलांचं संपर्क कार्यालय सुरू!
-पूर ओसरताच पुन्हा चालू होणार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा!
-रामदास आठवलेंची सांगली-कोल्हापूरच्या पुरग्रस्तांना 50 लाखांची मदत
Comments are closed.