चंद्रपूर महाराष्ट्र

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांच्या आरोपांवर भावजय पल्लवी आमटे म्हणाल्या…

चंद्रपूर | सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे करजगी यांच्या सासू-सासऱ्यांनी केेलेल्या आरोपांवर शीतल आमटे यांची सख्खी भावजय पल्लवी कौस्तुभ आमटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शीतल आमटे करजगी यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या सासूबाई सुहासिनी करजगी आणि सासरे शिरीष करजगी यांनी फेसबुक पोस्टवर जे लिहिलं, त्यावर सध्या बोलून काही उपयोग नाही, असं पल्लवी आमटेंनी म्हटलंय.

शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणी जी चौकशी सुरु आहे, त्यातून सगळं समोर येईल. मात्र या नुकसानातून सावरायला आम्हाला वेळ लागणार आहे, असं पल्लवी कौस्तुभ आमटे यांनी म्हटलं आहे.

डॉ. शीतल आमटे अत्यंत बुद्धिमान आणि गुणवत्तादायी होत्या. त्यांनी जी स्वप्नं पाहिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करु, त्या दिशेने काम करत राहू, असंही पल्लवी आमटे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

“जे खरं आहे ते आम्ही दाखवतोय, रुग्णसंख्येबाबत कुठलाही लपंडावाचा खेळ केलेला नाही”

चिंताजनक! कोरोना रूग्णांमध्ये आढळली 2 नवी लक्षणं

तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय- उद्धव ठाकरे

कोरोनावर मुख्यमंत्र्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत- अजित पवार

रेखा जरे हत्येप्रकरणी पोलिसांचा धक्कादायक खुलासा; ज्येष्ठ पत्रकारानंच दिली सुपारी!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या