Pan card Aadhaar Linking | आधारकार्ड हे पॅनला लिंक (Pan card Aadhaar Linking) करण्यासाठी वर्षभरापासून नागरिकांना संधी देण्यात आली होती. मात्र तरीही अद्याप नागरिकांना आपलं आधारकार्ड हे पॅनला लिंक केलं नाही. याबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आयकर विभागाने पुन्हा एकदा पॅन हे आधारकार्डला जोडलं (Pan card Aadhaar Linking) जावं असं सांगितलं आहे. त्यांनी ट्विट करत सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
31 मे 2024 आधी आधारकार्ड हे पॅनकार्डला जोडलं (Pan card Aadhaar Linking) जावं अशी माहिती आता आयकर विभागाने दिली आहे. या अतिम मुदतीपर्यंत लोकं काम करणार नाही त्यांच्या उत्पन्नावर जादा टीडीएस कपातचा सामना करावा लागणार आहे. (Pancard Aadhaar Linking)
काय होतं ट्विट?
प्राप्तिकर खात्याने नागरिकांना ट्विट करत यासंबंधीत माहिती दिली. “करदात्यांनी लक्ष द्या. 31 मे 2024 रोजीपूर्वी पॅन कार्ड, हे आधारकार्डसोबत जर जोडलं गेलं तर आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 206एए आणि 206 सीसी अंतर्गत उत्पन्नावर उच्च कपातीचा सामना करावा लागणार नाही”, तसेच याआधी एप्रिल महिन्यात याबाबत आयकर विभागाने आठवण करून दिली होती.
Kind Attention Taxpayers,
Please link your PAN with Aadhaar before May 31st, 2024, if you haven’t already, in order to avoid tax deduction at a higher rate.
Please refer to CBDT Circular No.6/2024 dtd 23rd April, 2024. pic.twitter.com/L4UfP436aI
— Income Tax India (@IncomeTaxIndia) May 28, 2024
काय नुकसान होईल?
आधारकार्ड जर पॅनशी जोडलं गेलं नाहीतर मोठं नुकसान होईल. सर्वात आधी तुम्ही विलंब केल्यास तुम्हाला ठराविक दंड भरून द्यावा लागणार आहे. तसेच आधार कार्डकडून कोणताही परतावा मिळणार नाही. पॅन कार्डबंद असल्याने तुम्हाला व्याज मिळणार नसल्याचं समजतंय. करदात्याकडून अधिक टीसीएस, टीडीएस वसूल करण्यात येईल.
तुम्ही आधारकार्ड हे आपल्या पॅनशी लिंक केलं आहे की नाही हे पाहायचं असेल तर घरबसल्या एक गोष्ट करावी लागणार आहे. सुरुवातीला आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे त्यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकवर क्लिक करावे लागेल.
याशिवाय 10 आकडी पॅन तर 12 आकडी आधारकार्ड क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर व्ह्यू लिंकवर जाऊन आधार स्टेटवर क्लिक करावं. यावेळी जर तुमचा आधारक्रमांक आधीच लिंक असेल तर आधार क्रमांक दिसेल. तुमचा आधारक्रमांक नसेल तर आधरकार्ड आपण लिंक करावं.
News Title – Pancard Aadhaar Card Linking Before 31 May 2024
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! अग्रवाल पिता-पुत्राला ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
अजित पवारांना मोठा धक्का; ‘त्या’ घोटाळ्याची राज्य सरकारकडून पुन्हा चौकशी सुरू
“शरद पवारांना शिवसेना संपवायचीये”, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Hrithik Roshan सोबत पुन्हा रोमांन्स करणार अमिषा पटेल?; स्वत:च केला मोठा खुलासा
भुजबळ यांच्यानंतर आता समता परिषदेचा मनुस्मृतीला विरोध