महाराष्ट्र मुंबई

…तर 17 कोटी नागरिकांचं पॅन कार्ड रद्द होणार; आयकर विभागाचा इशारा

मुंबई | येत्या 31 मार्च 2020 पर्यंत पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर 17 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल, असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिला आहे. देशातील 17 कोटी नागरिकांनी अजूनही आपलं पॅन कार्ड आधारशी लिंक केलेलं नाही.

पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने याअगोदर अनेकवेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, अजूनही देशातील 17 कोटी नागरिकांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाही. त्यामुळे सीबीडीटीने आता निर्वाणीचा इशारा दिला आहे.

27 जानेवारी 2020 पर्यंत 30.75 कोटी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले आहेत, अशी माहिती सीबीडीटीने दिली आहे. मात्र, अजून 17.58 कोटी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या लोकांचे पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.

ट्रेंडिंग बातम्या-

गद्दारांना पक्षात स्थान नाही, दोन दिवसांत हकालपट्टी करणार- राज ठाकरे

इंदुरीकर महाराजांचा झटका; एकाच इशाऱ्यात यूट्यूब चॅनेलवाल्यांनी व्हिडीओ उडवले!

महत्वाच्या बातम्या-

सरपंच निवडीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला थोरातांच्याच गावात विरोध

“भाजप सरकारने केलेल्या चुका महाविकास आघाडीला दुरूस्त कराव्या लागतील”

3 दिवसात अर्धा किलो वजन कमी झालं- इंदुरीकर महाराज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या