मुंबई | राज्यात उद्यापासून म्हणजे 23 तारखेपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या बंदीचं उल्लंघन करणाऱ्या नांगरिकांना 5 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
दुकानदार, फेरीवाले, हॉटेल, रुग्णालये, मॉल्स अशांकडे प्लास्टिक आढळले तर त्यांना 5 ते 20 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पुनर्वापर होऊ शकत नाही, असं प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर ही कारवाई होईल.
दरम्यान, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी ही प्लास्टिकबंदी दुटप्पी असल्याची टीका केली आहे. ब्रँडेड कंपन्यांना प्लास्टिक वापरास परवानगी दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
महत्त्वाच्या बातम्या –
-आत्ता सोनं खरेदी केलं तर होऊ शकतो जबरदस्त फायदा!
-2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
-अतिउत्साही मोदी भक्तांना अमित शहांनी दिले नम्रतेचे धडे!
-मुख्यमंत्र्यांकडून कामाचं कौतुक अन् सभागृह गळायला लागलं!
-नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत!