रांची | सोशल मिडियावर रोज नवीन व्हीडिओ व्हायरल होत असतात. यादरम्यान झारखंड राज्यातील धनाबाद येथील भाजी विक्रीतेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या भाजी विकणाऱ्याला चुलबुल पांडे म्हणून ओळखलं जातं. या भाजीविक्रेत्याचं नाव रितेश पांडे असून हा भाजी विक्रेता डान्स करुन आपल्या ग्राहकांना आकर्षित करतो.
धनबादमधील हिरापूर काॅलनीमध्ये पांडे भाजी विकत असून त्यांच्या गाड्याच्या समोर एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपावरुन एका महिलेने पांडेंचा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओ मध्ये पांडे डोक्यावर पांढरा फेटा आणि जोळ्यांवर काळा चष्मा घालून डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्या महिलेने सोशल मीडियावर टाकताच तो प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.
धनबाद येथील हिरापूर कॉलिनिमध्ये पांडेयजी भाजीपाला विकतात. रोज सकाळी उठून रात्री दहा वाजेपर्यंत ते आपला व्यवसाय करतात. यावेळी संपूर्ण दिवसभर त्यांचा उत्साह कायम असतो. जेव्हा भाजीपाला विकण्यासाठी ते ग्राहाकांना बोलवतात. तेव्हा ते खास शैली वापरतात. डोक्यावर फेटा आणि डोळ्यावर काळा चस्मा लावून ते ग्राहकांना साद घालतात. तसेच, वेगवेगळ्या गाण्यांवर ते जबरदस्त डान्ससुद्धा करतात. भाजीपाला विकण्यासाठी त्यांनी एक स्पेशल गाणंसुद्धा तयार केलं आहे.
भाजी विकताना तुम्ही डान्स का करता?, असं विचारल्यावर ग्राहक आकर्षित व्हावेत तसेच, नागरिकांनी आपल्या कुटुंबियांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा म्हणून मी हे करतो, असं रितेश पांडेय यांनी सांगितलंय.
चुलबुल पांडेय का स्टाइल और इनका सब्जी बेचने का अंदाज़ धूम मचा रहा है।।। pic.twitter.com/YeW4XbyrDo
— satyajeet kumar (@satyajeetAT) March 20, 2021
थोडक्यात बातम्या-
“अनिल देशमुख यांच्याआधी उद्धव ठाकरेंचा राजीनामा घ्या, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”
“महाराष्ट्रात गृहविभाग नेमकं कोण चालवतंय; अनिल परब की अनिल देशमुख?”
“ठाकरे सरकार चोरांचं, खुन्यांचं असून ते बरखास्त करण्यात यावं”
“वाझेला कामावर रुजू करून घेताना सरकार काय झोपलं होतं का?”
“…त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा दिला होता का?”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.