Top News महाराष्ट्र राजकारण सोलापूर

पंढरपुरात पुन्हा रणधुमाळी… राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला?, भाजपच्या हालचाली वाढणार???

सोलापूर | पंढरपुरात पुन्हा निवडणूक लागण्याचे सौम्य संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. दिवंगत आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या सुरवातीला पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंढरपुरात राजकीय बैठकांना वेग आला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे पंढरपूर मतदारसंघाची रिकामी झालेली जागा भरण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी चालू केली आहे. यासाठी निवडणूक आयोगाने पंढरपूर मतदारसंघातील मतदार केंद्राची यादी मागवली आहे. त्यामुळे पंढरपुरात निवडणूकीचा ‘धुरळा’ उडणार, हे स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीची चाहुल लागताच, राष्ट्रवादीकडून उमेदवारी कोणाला मिळणार? याची उत्सुकता मतदारसंघात पहायला मिळत आहे. पंढरपुरात सर्वेक्षण करून उमेदवारी देण्यात येईल, अशी प्राथमिक माहिती आहे. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा असेल. भारत भालके पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे नेते होते. त्यामुळे राष्ट्रवादीला ही पोकळी भरुन काढण्यास अवघड जाईल.

भारत भालकेंच्या निधनानंतर सोलापुरात भाजप ‘राजकीय संकेत’ पाळणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विद्यमान आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध लढण्याची पद्धत आहे. सध्यातरी या निवडणुकीसाठी भाजपाच्या हालचाली दिसत नाही.

थोडक्यात बातम्या – 

अनुदान कमी होतंय, पेट्रोलप्रमाणे गॅससाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार!

जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; अरुण गवळीच्या कोरोना टेस्टचा निकालही आला!

…तर कोल्हापुरी हिसका दाखवू, ‘या’ भाजप नेत्याला स्वाभिमानीचा इशारा

भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी

धक्कादायक…. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या