बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंडित नेहरू, वाजपेयींकडे जम्मू काश्मीरसाठी जे धोरण होतं ते मोदींकडे नाही”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यापासून जम्मू-काश्मिरच्या विकासाचा मुद्दा चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर पीपल्स डेमोक्रॉटीक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पंडित नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे जम्मू काश्मिरविषयी धोरण होतं, परंतु नरेंद्र मोदींकडे ते धोरण नाही. केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घाईघाईने घेतला आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या विकास कामाविषयी चर्चा करण्यासाठी स्थानिक पक्षांना आमंत्रित केलं होत. मात्र या चर्चेत स्थानिक पक्षांत समाधान झालेलं नाही. त्याचबरोबर केंद्र सरकार जम्मू- काश्मीरचा वापर एक प्रयोगशाळा म्हणुन करत असल्याचंही मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

जम्मू- काश्मीरच्या पुर्नरचना ही अत्यंत घाईघाईने करण्यात आली आहे. फक्त शाळांना शहीदांची नावे देऊन विकास होणार आहे का? तसेच यामुळे तरूणांना रोजगार मिळणार नाही. अशातच आता केंद्र सरकार तालिबान विषयी बोलत आहे. परंतु बेरोजगारीच्या मुद्यावर बोलत नाही, असंही मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

दरम्यान, देशामध्ये सध्या मोदी सरकार हिंदु आणि मुस्लिमांमध्ये फुट पाडत आहे. आम्ही आता पाकिस्तानी झालो आहोत आणि फक्त भाजपचं देशात हिंदुस्थानी म्हणून वावरत आहे, असंही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.

थो़डक्यात बातम्या-

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

टीईटी परीक्षा पुढे ढकलली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली नवीन तारीख

येत्या 48 तासात ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार… वाचा हवामान खात्याचा अंदाज!

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बसणार चाप, आता होणार थेट वाहन जप्तीची कारवाई!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More