तलवारीने चेहऱ्यावर सपासप वार करुन धनंजय मुंडेंच्या समर्थकाची हत्या

बीड | ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कट्टर समर्थकाची हत्या झाली आहे. पांडुरंग गायकवाड असं त्यांचं नाव आहे.

परळी उड्डाणपूलाखाली अज्ञातांनी त्यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पांडुरंग गायकवाड यांची पत्नी मिनाबाई राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहे. तसेच ते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कोणी आणि का ही हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.  

महत्वाच्या बातम्या-

-चौकीदारानेच देश खाल्ला; शरद पवारांचा मोदींवर घणाघात 

-देवेंद्रजी मला तुमचा अभिमान वाटतो, तुम्ही दिलेला शब्द पार पाडला- उद्धव ठाकरे

-चेहऱ्यावर तलवारीने वार करुन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

-बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

-मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात, दिल्ली कॅपिटलकडून 37 धावांनी पराभव