पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार?

मुबंई | हार्दिक पंड्या आणि के एल राहुल मे-जून मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतही खेळू शकणार नाहीत, असे संकेत प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडुल्जी यांनी एका मुलाखतीतून दिले.

या प्रकरणाच्या तपासासाठी बीसीसीआयने सहा सदस्यीय समिती नेमली आहे आणि त्यांच्या चौकशीनंतर या दोघांवरील शिक्षा ठरवण्यात येणार आहे.

आयसीसी किंवा राज्य संघटनांच्या कोणत्याही स्पर्धांमध्ये ते दोघं सहभाग घेऊ शकत नाही. त्यांच्यावरील शिक्षेचा कालावधी वाढला, तर ते आयपीएलमध्येही खेळू शकणार नाही.   

दरम्यान, या दोघांसाठी दोन सामन्यांच्या बंदीची मागणी केली होती, परंतु एडुल्जी कठोर कारवाईच्या भूमिकेवर ठाम आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी

-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे

-सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार

-पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग

-“बोफोर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार”

Google+ Linkedin