मुंबई | ‘पानिपत’ हा चित्रपट काय प्रदर्शित झाला. या ऐतिहासिक चित्रपटाची उत्सुकता होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. पहिल्या दिवशी पानिपतने 4. 12 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या टीमला अपेक्षित कमाई पहिल्या दिवशी झाली नाही. मात्र येत्या दिवसात याची भर भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत चित्रपटात अर्जुन कपूर, क्रिती सनॉन, संजय दत्त यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांसह समिक्षकांची मनं जिंकली आहेत. बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवणं ‘पानिपत’ला जमलेलं नाही.
पानिपत जवळपास तीन तासांचा असल्याने मल्टिप्लेक्समध्ये शो टाइम देताना थिएटर मालकांना विचार करावा लागत असल्याचं बोललं जात आहे. याच दिवशी कार्तिक आर्यनचा ‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 9.10 कोटी रुपये कमावले आहेत. कार्तिकचा हा सलग पाचवा हिट चित्रपट ठरतोय.
दरम्यान, येत्या दिवसात पानिपत किती कमाई करतो, हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेनं मंजूरी दिलेले प्रकल्प आता शिवसेनाच थांबवतेय- राधाकृष्ण विखे पाटील – https://t.co/zWaC6o69rk @RVikhePatil @OfficeofUT @ShivSena @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) December 7, 2019
“बलात्काराची राजधानी अशी भारताची ओळख झालीय, नरेंद्र मोदी गप्प का?” https://t.co/kmKI7gZP5s @narendramodi @RahulGandhi
— थोडक्यात (@thodkyaat) December 7, 2019
“राष्ट्रवादी सोडलेले नेते शरद पवार आणि अजित पवारांना भेटून गेलेत” – https://t.co/zw2esUmrrh @nawabmalikncp @NCPspeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks
— थोडक्यात (@thodkyaat) December 7, 2019
Comments are closed.