पंजाबमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, महाराष्ट्रात कधी?

चंदीगड | महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी अभ्यासाच्या गर्तेत अडकली असताना तिकडे पंजाब सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलीय. ५ एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांचं २ लाख रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलंय. 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केली. पंजाबमधील १९ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या निधीतही वाढ करण्यात आलीय. अशा कुटुंबाना आता ५ लाख रुपये मिळणार आहेत.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या