Weather update | पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांचा शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक महत्त्वाचा आणि तातडीचा संदेश आला आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक (Weather Expert) पंजाबराव डख यांनी त्यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर (YouTube Channel) महाराष्ट्रातील हवामानाबाबत (Weather) महत्त्वाची माहिती दिली आहे. नुकताच राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून डिसेंबर महिन्यासारखी परिस्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते, असे त्यांनी सांगितले आहे. (Weather update )
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील थंडी कमी झाली असून, काही ठिकाणी ढगाळ हवामान (Cloudy Weather) आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, डिसेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसासारखा (Unseasonal Rain) पाऊस पुन्हा पडणार का? असा प्रश्न पडला आहे. भारतीय हवामान खात्यातील (Indian Meteorological Department) काही तज्ञांनी पुढील काही दिवसांत मराठवाडा (Marathwada), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि विदर्भातील (Vidarbha) काही भागांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
पंजाबराव डख यांनी देखील १५, १६ आणि १७ जानेवारीला महाराष्ट्रातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे १७ जानेवारीपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहील, असे त्यांनी सांगितले.
चाळीसगाव (Chalisgaon) आणि परिसरात तुरळक ठिकाणी हलका पाऊस (Light Rain) होऊ शकतो, तसेच लातूर (Latur) आणि सोलापूर (Solapur) भागातही हलका पाऊस पडू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. परंतु, महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी (Konkan Coast) या भागात पुढील तीन दिवस फक्त ढगाळ वातावरण राहील. राज्यात कुठेही मोठा पाऊस पडणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. (Weather update )
ज्या शेतकऱ्यांची तूर काढणी (Tur Harvesting) सुरू आहे, त्यांनी ती पूर्ण करावी. ज्यांची कांदा काढणी (Onion Harvesting) सुरू आहे, त्यांनी ती पूर्ण करावी आणि कांदा लागवड (Onion Planting) सुरू असेल तर ती पूर्ण करावी, असे आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अंदाज
पंजाबराव डख यांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. त्या वेळी शेतकऱ्यांसाठी नवीन अंदाज जारी केला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. (Weather update )
Title : Panjabrao Dakh predicts Weather update of Maharashtra
महत्वाच्या बातम्या-
बीड पुन्हा हादरलं, अत्यंत धक्कादायक घटना समोर
अभिनेता सैफ अली खानच्या एकूण संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!
‘या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळणार नाहीत
HERO स्प्लेंडरच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्प्लेंडर
पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम करेल मालामाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई