कराड | कोरोनामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अशातच राज्य सरकार चुकीच्या पध्दतीने भरमसाट व्याज लाऊन वीजबिलाच्या वसुलीतून शेतकऱ्यांना लूटण्याचं काम करत आहे, असं म्हणत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी राज्य सरकार वर निशाणा साधला आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणीही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल भरू नये, असं आम्ही जाहीर करत आहोत. मुख्यमंत्री जे बोलतात ते कधीच करत नाहीत, या मुख्यमंत्र्यांनी गेल्यावर्षी नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार देण्याची घोषणा केली होती. मात्र, आजपर्यंत एक रुपयाही मिळाला नाही, अशी टीका पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. याशिवाय शेतकरी अडचणीत असताना कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशीला पिळ मारणारे घरात बसलेले आहेत, अशी टीका पंजाबराव पाटील यांनी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर नाव न घेता केली आहे.
बळीराजा शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने वीज कनेक्शन तोडणी विरोधात वीजबिल फाडून दत्त चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आलं आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, शेतकरी कामगर पक्षाचे ऍड. समीर देसाई, माणिक अवघडे, राज्य संघटक दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, वीज वितरणचे कर्मचारी घरात वीजबिल तोडण्यासाठी आले आणि वीज तोडण्याचा प्रयत्न केला तर ती वीज जोडून देण्याचे काम बळीराजा शेतकरी संघटना करेल, असं आश्वासनही यावेळी पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत बंद पण…
अडवाणी, अजित पवारांनी जी परंपरा पाळली ‘ती’ संजय राठोडांनीही पाळावी- सुधीर मुनगंटीवार
धक्कादायक! भाजप पदाधिकाऱ्यासह चौघांनी केला वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार
…अन् पुन्हा एकदा भर कार्यक्रमात नेहा कक्करला कोसळलं रडू, सारेच झाले स्तब्ध!
सोन्याच्या दरात वाढ, चांदीला झळाळी; जाणून घ्या आज काय आहेत भाव