मुंबई | आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खान .यांचं आज निधन झालं. त्यांच्या शिष्याने म्हणजे पंकज त्रिपाठीने इरफानप्रति आपल्या भावना व्यक्त करताना निशब्द व्हायला होतं आहे तसंच कंठ दाटून आला आहे, असं म्हटलं आहे.
कधी कधी भावना व्यक्त करणं जमत नाही; आता तेच होतंय इरफानदा, असं ट्विट पंकज त्रिपाठीने केलं आहे. पंकज त्रिपाठी इरफान खान यांना आपला गुरू मानत असे. त्यांचं एक खास नातं होतं. दोघांमध्ये विशेष जिव्हाळा होता.
पंकज त्रिपाठीने इरफान खान यांच्यासोबत काढलेले काढलेले फोटो शेअर करताना तसंच भावना व्यक्त करताना निशब्द व्हायला होतं आहे, असं म्हटलं आहे. इरफान खान यांच्याकडून मी खूप काही शिकलो असल्याचं पंकजने म्हटलं आहे.
दरम्यान, इरफानच्या जाण्याने बॉलिवूडकरांवरच नाही तर जागतिक सिनेमावर फार मोठा परिणाम होणार आहे. इरफान एक अभिनेता म्हणून तर ते सर्वांचे आवडते होतेच परंतू माणूस म्हणून देखील लोकांना ते तितकेच भावायचे. अनेकदा काही प्रकरणांमध्ये वा मुद्दावर ते आपली परखड मते व्यक्त करत. मात्र त्यांच्या अश्या अकाली जाण्याने सिनेसृष्टी पोरकी झाली आहे.
कभी कभी भावनाओं को बता पाना सम्भव नही होता , वहीं हो रहा है इरफ़ान दा।🙏🏾
— पंकज त्रिपाठी (@TripathiiPankaj) April 29, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे
अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली- असदुद्दीन औवेसी
महत्वाच्या बातम्या-
…अन् अवघ्या 19 दिवसात व्हाईट हाऊसनं नरेंद्र मोदींना अनफाॅलो केलं!
नरेंद्र मोदींनी अभिनेता इरफान खानला वाहिली श्रद्धांजली; म्हणाले…
इरफान, आमचा तुझ्यावर ‘हक्क’ आहे आणि तुझ्याशी आमचा ‘रिश्ता’ही कायम राहिल…
Comments are closed.