पंकजांनी सुरेश धस यांना 15 कोटी रूपये दिले, धनंजय मुंडेंचा आरोप

बीड | राष्ट्रवादी सोडून भाजपशी घरोबा केलेल्या सुरेश धस यांच्यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी खळबळजनक आरोप केलाय. 5 जिल्हा परिषद सदस्य भाजपला देण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडून 15 कोटी रूपये घेतले, असा हा आरोप आहे.

सुरेश धस यांचे विरोधक बाळासाहेब आजबे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी धनंयज मुंडे बोलत होते.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यामुळेच राष्ट्रवादी सोडत असल्याचा आरोप धस यांनी केला होता. धनंजय मुंडेंना काविळ झाल्यामुळे जगचं पिवळं दिसतंय असं म्हणत सुरेश धस यांनी आरोप फेटाळून लावलेत