Top News

भाजपच्या बैठकीला गैरहजर, नंतर रात्री 12 वाजता पंकजा मुंडेंचं सूचक ट्वीट!

मुंबई | आजारी असल्यामुळे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला काल गैरहजर होत्या. त्यानंतर रात्री बारा वाजून सात मिनिटांनी ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी येत्या बारा तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे.

12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना गोपीनाथ गड येथे आमंत्रण. तुम्ही सारे या.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे. तुम्ही ही या.. वाट पहाते, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

तब्येत ठीक नसल्यामुळे पंकजा मुंडे भाजपच्या मराठावाडा विभागीय बैठकीला उपस्थित राहिल्या नसून त्यांनी माझी परवानगी घेतली आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांमुळेच त्या गैरहजर राहिल्याचं बोललं जात होतं.

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या