बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काळजी घे, दगदग करू नको’; पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडेंना रूग्णालयात दाखल केल्यानंतर आज भाजप नेत्या पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे त्यांच्या भावाची भेट घेण्यासाठी रूग्णालयात पोहोचल्या.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) व प्रीतम मुंडेंनी (Pritam Munde) त्यांच्या आईसह धनंजय मुंडेंची भेट घेतली. हे भाऊ-बहिण राजकारणातील कट्टर वैरी असते तरी धनंजय मुंडेंची तब्येत बिघडताच दोन्ही बहिणी भावाची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाल्या.

या भेटीत कौटुंबिक चर्चा झाली असल्याचं समोर येत असून पंकजा मुंडेंनी भावाला आपुलकीचा सल्ला दिला आहे. दादा काळजी घे. फार दगदग करू नकोस, असा सल्ला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना दिला आहे. धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याचंही पंकजा मुंडे यांनी भेटीनंतर सांगितलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडेंना भोवळ आल्याने त्यांची शुद्ध हरपली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंडेंना दोन ते तीन दिवसानंतर डिस्चार्ज मिळणार असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर डॉक्टरांनी धनंजय मुंडेंना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे एंटरटेनमेंट, सिनेमात असतं तसं”

‘धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका नाही तर…’; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

…अन् महिला चक्क topless होऊन मैदानात पळत सुटली, पाहा व्हिडीओ

“राज ठाकरेंना एवढं महत्त्व देऊ नका, माझ्याकडे तेवढा वेळ नाही”

“वारसा प्रबोधनकारांचा विचारसरणी मात्र नथुराम गोडसेची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More