धनंजय मुंडेंना रोखण्यात आलं ते बरोबरच- पंकजा मुंडे

नागपूर | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना वैद्यनाथ साखर कारखान्याच्या दुर्घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं हे बरोबरच होतं, असं स्पष्ट पंकजा मुंडे यांनी दिलंय. 

कारखान्यात गरम उसाच्या रसाची टाकी फुटून 5 जणांचा मृत्यू झालाय. मात्र या घटनेवरुन दोन्ही भावा-बहिणीमध्ये राजकारण सुरु झालंय. 

मला घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता.  मात्र रोखण्याऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना अधिवेशनात बघून घेऊ, अशी अशोभनीय भाषा करून पदाचा गैरवापर करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित होतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.