…तो शासन निर्णय ‘ऊसतोड कामगार महामंडळा’चा नव्हे तर ‘सुरक्षा योजने’चा?

मुंबई | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उद्याचा सूर्य मावळण्याच्या आत ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र यावरुन सोशल मीडियावर गदारोळ सुरु झाला आहे. 

पंकजा मुंडे यांनी ‘ऊसतोड कामगार महामंडळ’ स्थापन झाल्याची घोषणा अद्याप केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्या जोरदार ट्रोल होत आहेत. 

दुसरीकडे पंकजा मुंडे समर्थकांकडून एक शासन निर्णय सोशल मीडियावर शेअर केला जातोय. मात्र हा ‘ऊसतोड कामगार महामंडळ’ स्थापन झाल्याचा शासन निर्णय नसून तो ‘लोकनेते गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजने’चा शासन निर्णय आहे. त्यावर तसा स्पष्ट उल्लेख आहे. 

दरम्यान, हा सगळा गदारोळ सुरु असताना पंकजा मुंडे यांनी मात्र अद्याप यासंदर्भात कुठलीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पंकजाताई, दिवस मावळला… कुठं आहे ऊसतोड कामगार महामंडळ?

-दसऱ्याच्या मुहूर्तांवर हर्षवर्धन जाधवांनी केली नव्या पक्षाची स्थापना!

-राष्ट्रवादीच्या सरपंचावर गावकऱ्याचा लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप!

-मुंडेंनी भाषणबाजी बंद करून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान करावा!

-भाजपच्या ‘या’ तीन प्रवक्त्यांना माध्यमांसमोर बोलण्यास भाजपकडून बंदी!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या