पंकजाताई, दिवस मावळला… कुठं आहे ऊसतोड कामगार महामंडळ?

मुंबई | पंकजाताई, दिवस मावळला… कुठं आहे ऊसतोड कामगार महामंडळ?, असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना विचारला जाऊ लागलाय. सोशल मीडियावर हा प्रश्न विचारला जातोय.

सावरगावच्या दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी उद्या दिवस मावळायच्या आत ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करु, अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप या महामंडळाची घोषणा झालेली नाही. 

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संध्याकाळ होताच हा मुद्दा उपस्थित केला. पंकजा मुंडे यांना या मुद्द्यावरुन ट्रोल करण्यात आलं. 

दरम्यान, पंकजा मुंडे समर्थकांनी एक अध्यादेश सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मात्र तो ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजनेचा अध्यादेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दसऱ्याच्या मुहूर्तांवर हर्षवर्धन जाधवांनी केली नव्या पक्षाची स्थापना!

-राष्ट्रवादीच्या सरपंचावर गावकऱ्याचा लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप!

-मुंडेंनी भाषणबाजी बंद करून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान करावा!

-भाजपच्या ‘या’ तीन प्रवक्त्यांना माध्यमांसमोर बोलण्यास भाजपकडून बंदी!

-मुख्यमंत्रीसाहेब…हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स? धनंजय मुंडेंचा सवाल