शहा-मोदींना भेटूनही पंकजा मुंडे नाराज?, त्यावर दानवेंनी केलं मोठं विधान
औरंगाबाद | राजकारण हे पद व प्रतिष्ठा यांच्या भोवताली फिरत असतं. आपल्या समाजाच्या माध्यमातून राजकारणात प्रभावी ठरणारे नेते आपण पहात असतो. राजकारणी लोकांवर घराणेशाहीची टीका पण होत असते. पण या टीकेला नेतेमंडळी अगदी प्रभावी उत्तर देऊन टाळत असतात. हा प्रकार महाराष्ट्रात वारंवार घडत असतो.
भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचा राजकीय संघर्ष सर्वांना माहीतच आहे. त्यांचा राजकीय वारसा आज त्यांच्या मुली चालवत आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे व बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या नेहमी चर्चेत राहणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून सुरू झालेला वाद अजून थांबलेला नाही.
पंकजा या आपल्या बहीण प्रीतम यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत, अश्या बातम्या व चर्चा राजकीय वर्तुळात चालूच आहेत. पण आता या चर्चावर पडदा टाकण्याचं काम भाजप नेते आणि केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे या नाराज नसल्याचं विधान त्यांनी केलं आहे.
एखादा नेता दिल्लीत जातो. मोठ्या नेत्यांना भेटतो तेंव्हा त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये असंही ते म्हणाले आहेत. पंकजांच्या वागण्यातून बोलण्यातून त्या नाराज आहेत असं कधी वाटलं नाही. तसेच ज्या घोषणा भागवत कराड व पंकजा मुंडे यांच्या समोर दिल्या गेल्या त्याचा चुकीचा अर्थ लावू नका असंही ते म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या
कोरोना इफेक्ट… HIV बाधितांच्या संख्येबाबत चांगली बातमी आली समोर
कधीकाळी होता कैदेत, आता होऊ शकतो अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
भर सामन्यात बाचाबाची, अन् बाल्कनीत कोहली पेटला; पाहा नेमकं काय झालं?
टाटा मोटर्सचा नवा धमाका, ‘ही’ गाडी तोडू शकते मार्केटचे सर्व रेकॉर्ड्स…
“सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल”
Comments are closed.