बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीडमध्ये धनंजय मुंडेंना धक्का, तर पंकजा मुंडे ठरल्या ‘किंग’

बीड | बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणूक पार पडली. यावेळी तीन नगरपंचायतीमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. केज येथे आघाडी तर आष्टी, पाटोदा आणि शिरूर येथे भाजपनं मुसंडी मारली आहे. तर प्रतिष्ठेच्या ठरलेल्या वडवणी नगरपंचायतीत भाजपचे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादी विजयी झाली आहे.

बीड जिल्हात गेल्या महिन्यामध्ये पाच नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. सोमवारी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. आष्टी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पल्लवी धोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्त्रबुद्धे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. तीन नगरपंचायतींवर भाजपला विजय मिळाला आहे तर हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, सत्ता असूनही यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले. लोकांनी भाजपाला पहिली पसंती दिली आहे. ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हती. एका मतदारसंघाचं नेतृत्व आणि जिल्ह्याचं पालकत्व यात फरक असतो. लोकांचा गेल्या अडीच वर्षातील राग आणि आमच्या कार्यकाळातील कामकाजाची पावती, असा तो निकाल आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बीडमधील लोकांनी भविष्यात काय चित्र असेल ते दाखवून दिलं आहे. बीड जिल्ह्यात भाजपा सोडून एकसंध असा कोणताही पक्ष नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. जे नेते आहेत ते एका भागापुरते आहेत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणारा असा एकही नेता नाही, अशी टीका पंकजा यांनी केली आहे. सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला आहे. जो विजय मिळाला आहे तो कार्यकर्त्यांचा आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मुलांच्या मनात एकमेकांच्या द्वेषाच विष पसरवू नये, भेदाभेद करणारे…”

‘जेवणापेक्षा Sex आवश्यक’; समंथाच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ

‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणत मनसेजी बॅनरबाजी, सोशल मीडियावर एकच चर्चा

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे नवे निर्देश, अशी असेल नियमावली

valentine Day: ‘तू माझा आहेस’; म्हणत मलायकानं शेअर केला ‘तो’ फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More