Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड लोकसभा (Beed Lok Sabha Result 2024) मतदारसंघातील पराभवामुळे सध्या जिल्ह्यात तणावग्रस्त वातावरण आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव हा त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या नैराश्यातूनच गेल्या काही दिवसांमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या तीन कट्टर समर्थकांनी आत्महत्या केल्या आहेत.
नैराश्याच्या भरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे भावूक होताना दिसल्या. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य
माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे. माझ्या पराभवानंतर निराश झालेले लोक स्वत:चे प्राण देत आहेत. लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने मला सध्या अपराधी वाटत आहे. एरवी मी हिंमतीने लढणारी आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
मी हिंमतीने लढणारी आहे, पण सध्या या गोष्टींनी प्रचंड डगमगली आहे. या कुटुंबाच्या मागे मी उभी राहणार आहे. पण आत्महत्येसारख्या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही. मी लोकांना आवाहन करते की, त्यांनी असं काही करु नये, असं आवाहन त्यांनी केलं.
राजकारणात जय-पराजय हे सुरु असते. पण सध्या राजकारण ज्या पद्धतीने आकार घेत आहे, त्यामुळे लोक निराशेच्या गर्तेत कोसळत आहेत. आम्ही कमी आहोत, आम्ही राजकारणाच्या प्रवाहात काहीच बदलू शकत नाही, असा न्यूनगंड लोकांमध्ये तयार होत आहे. ज्या पद्धतीने राजकारण बदलत आहे, या भावना लोकांना आक्रोशाकडे नेत आहेत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
Pankaja Munde | “तुमचा जीव म्हणजे माझा जीव आहे”
आपल्या लहान लेकरांना, परिवाराला वाऱ्यावर सोडून असे आत्महत्या करणे हे मला पसंत पडणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर मी नक्की तुम्हाला त्याची संधी देईल. पण आपला जीव गमावू नका. तुमचा जीव म्हणजे माझा जीव आहे असं समजून जपा तो, शपथ आहे या निराशेतून बाहेर या, असं त्या म्हणाल्यात.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित पवार यांच्या एका ट्विटने पोलीस प्रशासन हललं, हजारो विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
प्रसिद्ध रिलस्टार सनी जाधववर बलात्काराचा आरोप; सोशल मीडियावर खळबळ
“दलित बुद्धांनो आता तरी शहाणे व्हा!”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
महिलांच्या ‘या’ सवयींमुळे पतीचं आयुष्य होतं बरबाद!
“तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर…”; आदित्य ठाकरेंना ‘या’ नेत्याचं खुलं आव्हान